ताज्या घडामोडी

येसलेवाडी, बेरडेवाडी व कोकणेवाडीसाठी 1 कोटी 28 लाख 925 रुपये खर्चाच्या पाणी योजनेचा भूमिपुजन समारंभ संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या शुभहस्ते भूमिपुजन झाले. संभाव्य लोकसंखेनुसार येसलेवाडी (22 हजार लिटर), बेरडेवाडी (12 हजार लिटर) व कोकणेवाडी (6 हजार लिटर) क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते कोकणेवाडी येथील योजनेच्या पाणी टाकीचे भूमिपूजन व येसलेवाडी येथे स्थानिक विकास निधीतून श्री. भुतोबा व श्री. नाईकबा मंदिरासमोर 8 लाख 40 हजार रुपये खर्च करून बांधलेल्या सभागृहाचे उद्‌घाटन झाले. यावेळी बेरडेवाडी येथे स्थानिक विकास निधीतून पूर्ण केलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचे उद्‌घाटन आमदार मानसिंगभाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमास तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक, विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, विश्वास शिक्षणचे संचालक प्रकाश धामणकर, कोंडीबा चौगुले, बाबुराव कळंत्रे, वसंतराव भाडुगळे, माजी उपसरपंच सदाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य फय्यज डांगे, शामराव निर्मळ, तसेच विश्वास बेरडे, महेश बेरडे, आनंदा बेरडे, बाबासो बेरडे, लक्ष्मण येसले, आनंदा येसले, किसण येसले, मारुती शिगवण, माजी सदस्य राम बडदे, दिलीप सूर्यवंशी, प्रकाश भुसारी, ग्रामसेवक अरुण रेळेकर आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!