ताज्या घडामोडी

जेष्ठ पत्रकार प्रा.संजय थोरात यांचा सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

समाज माध्यमावर येणाऱ्या माहिती पेक्षा मुद्रित माध्यमातून येणाऱ्या माहितीवर लोकांचा जास्त विश्वास आहे. पत्रकारितेत आपले अस्तित्व आणि ओळख टिकवण्यासाठी अपारंपरिक विषयाच्या मांडणीवर भर द्या असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रा.संजय थोरात यांनी केले

शिराळा येथील संत गाडगेबाबा सांस्कृतिक भवन येथे शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित आजची पत्रकारिता आणि समाज मध्यम या विषयी एकदिवशीय कार्यशाळेत बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले, आजच्या धावपळीच्या युगात इंटरनेटने प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा घेतला आहे. आपण आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्या बातमीत गुणवत्ता ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी एक तास वाचन गरजेचे आहे. पत्रकारितेला परस्पर सौजन्याचा भाग बनू नका. पत्रकारितेत परंपरेचे आत्मभान असायला हवे. कोणतेही वार्तापत्र लिहिताना त्यात स्वयं स्पष्टता असायला हवी.

स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष संजय घोडे यांनी केले. यावेळी मनोज मस्के, सुरेश पवार ,रवी यादव ,संतोष बांदिवडेकर ,नारायण घोडे, आनंदा सुतार, अरुण पाटील, विजय गराडे,अमर पाटील, सचिन पाटील, प्रताप कदम, सुनील पाटील, अमर सूर्यवंशी,सुधीर शिंदे उपस्थित होते. आभार शिवाजीराव चौगुले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!