ताज्या घडामोडी

वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा.

Spread the love

मा.विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .सर्वप्रथम सकाळी ८:३० वाजता राष्ट्रगीत गायन व राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीतांचे गायन सुमधुर स्वरात करण्यात आले.त्यानंतर विस्तार अधिकारी सौ.तोटावर मॅडम यांच्या हस्ते ज्यांचा जन्मदिवस राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो अशा कविवर्य कुसुमाग्रज आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव गाण्यातून ,भाषणातून सादर केला. शिक्षकांमधून श्री.जंगम सर, श्री. सरगर सर, श्री चिले सर,श्री नंदादीप जाधव यांनी आपल्या भाषणातून,अभिनयातून,गीतातून मराठी भाषेचा गौरव,आपल्या जीवनातील मराठी भाषेचे महत्त्व वर्णन केले. सौ.तोटावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ओघवत्या शैलीतून खूप सुंदर मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पोतदार सर व पर्यवेक्षक श्री.जगताप सर यांनी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.एस.के.जाधव सरांनी केले. यावेळी मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील क्रीडाशिक्षिका आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!