आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

मनकर्णिका महिला महासंघातर्फे, शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न..

२६ फेब्रुवारी रोजी चौराई माता प्रतिष्ठान येथील मैदानात बक्षीसे देण्यात आली.

Spread the love

मनकर्णिका महिला महासंघातर्फे, शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न..२६ फेब्रुवारी रोजी चौराई माता प्रतिष्ठान येथील मैदानात बक्षीसे देण्यात आली.On February 26, prizes were awarded at the ground at Chaurai Mata   Manakarnika Mahila Mahasanghan, the prize ceremony of the competitions organized on the occasion of Shiv Jayanti concluded.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २७ फेब्रुवारी.

मनकर्णिका महिला महासंघ अध्यक्ष संस्थापिका. विनाताई करंडे यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ दिनांक २६ फेब्रुवारी रोजी चौराई माता प्रतिष्ठान येथील मैदानात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे. बाळासाहेब खांडभोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. शिवव्याख्याते. विशाल मोरे सर यांनी परीक्षणाचे काम केले होते.  बाळासाहेब खांडभोर यांनी मंत्रमुग्ध करणारे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित व्याख्यान दिले. तसेच यावेळी नव्याने लेफ्टनंटपदी नियुक्त होणाऱ्या वैभव शेप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यानीही आपले मार्गदर्शनपर मनोगत मुलांसमोर मांडले.

यावेळी विजेत्यांसह प्रत्येक सहभागीस प्रशस्तीपत्रक देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण १७३ मुलांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन कीर्ती पाटील यांनी केले. शितल काळोखे यांनी आभार मानले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत ढोरे, सारिका हुलावले, मोनाली भेगडे, राधा बनकर, सोनाली बनकर, अश्विनी आंबेकर, सुजाता मुलगी, शुभांगी भेगडे, यांचे सहकार्य लाभले. यावेळी सारिका नवले यांनी या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. सान्वी पाटील या चार वर्षाच्या चिमुकलीने आपल्या गोड आवाजात पोवाडा सादर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!