ताज्या घडामोडी

मराठी विभाग मुंबई विद्यापीठ आयोजित मराठी भाषा दिन मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा

Spread the love

डॉ. सुधीर रसाळ यांना आ.का. प्रियोळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला

मुंबई: फेब्रुवारी : मराठी विभाग मुंबई विद्यापीठठात २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात मुंबई विद्यापीठातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपआपल्या कला दाखवल्या. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केल्या जातो.

कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक व कवी रामदास भटकळ, विशेष सत्कार अ. का. प्रियोळकर, वक्ते डॉ. अरुण प्रभुणे ,मराठी विभागाचे विभगप्रमुख डॉ. वंदना महाजन , प्राध्यापक डॉ. अनिल सकपाळ,डॉ विनोद कुमरे, डॉ. सुनील अवचार, डॉ. श्यामल गरुड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली.1995 पासून अ. का. प्रियोळकार पुरस्कार प्रदान करत असतो यावर्षी डॉ. सुधीर रसाळ यांना प्रदान करण्यात आला आहे. मागच्या वर्षी डॉ जनार्दन वाघमारे यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच मुंबई विद्यापीठात अभिव्यक्ती कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयातून विद्यार्थी सहभाग झाले होते. विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी सलग्न सामावून करण्यात येते ,अनेक वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येत असतात.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली.आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन मराठी विभागाचे मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन यांनी केले.

यानंतर मुंबई विद्यापीठ मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.सुनील अवचार यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय केला. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिल सकपाळ यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ.विनोद कुमरे यांनी केले.

मला अनेक पुरस्कार प्राप्त झाले परंतु आजचा पुरस्कार हा माझ्यासाठी विशेष आहे. –
डॉ. सुधीर रसाळ – अ. का. प्रियोळकर पुरस्कार प्रदान

कार्यक्रमाचे वक्ते डॉ.अरुण प्रभुणे यांनी मराठी भाषा आणि संस्कृती या विषयावर विवेचन करत असताना पाश्चात्य संस्कृती व भारतीय संस्कृतीचा पैलूंचा उलगडा केला.यावेळी विद्यापीठाचे आजी माजी विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!