आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

कवी नारायण सुमंत यांच्या कवितांनी दुमदुमले कृष्णराव भेगडे स्कूलचे प्रांगण.

Spread the love

कवी नारायण सुमंत यांच्या कवितांनी दुमदुमले कृष्णराव भेगडे स्कूलचे प्रांगण.The courtyard of Krishnarao Bhegde School was filled with the poems of poet Narayan Sumant.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. २७ फेब्रुवारी.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा हा “मराठी राजभाषा दिन” अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी कविवर्य नारायण सुमंत , इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. डॉ. संभाजी मलघे, तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक. विजयकुमार खंदारे संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे, संस्थेच्या सचिव.  राजश्रीताई म्हस्के, संस्थेच्या खजिनदार. गौरीताई काकडे शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर इत्यादी उपस्थित होते.

आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व मराठी विषय शिक्षकांचाही योग्य तो सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या नर्सरी ते इ. १० वी. च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, वासुदेवाचे गीत, नृत्य, नाट्यवाचन, मराठी भाषेचा प्रवास , बडबडगीते, कथा यांचे अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण केले.

कार्यक्रमास लाभलेले सुप्रसिद्ध कवी कविवर्य नारायण सुमंत यांनी आपल्या मनोगतात सर्वात प्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व अतिशय सुंदर स्वरूपात कविवर्य कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली. त्यांच्या विविध कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मनोरंजनाबरोबरच शैक्षणिक मार्गदर्शन देखील केले . त्यांच्या कवितांनी शाळेचा सर्व आसमंत दुमदुमला होता. प्रगल्भ वाचन व विचारातूनच ही युवा पिढी घडत असते , या घडणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शक म्हणून त्यांची आई व शाळेतील शिक्षक अतिशय मोलाची कामगिरी करत असतात असेही त्यांनी सांगितले.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय. डॉ. संभाजी मलगे यांनी देखील शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशा आपल्या कविता सादर करून शिक्षणाची गोडी लागावी म्हणून वाचनाचा सल्लाही दिला. मुख्याध्यापक मनोगतात. मीना अय्यर यांनी देखील विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा आदर करावा व ती शुद्ध स्वरूपात बोलली जावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर शाळेतील शिक्षकांचे अतिशय सुंदर अशा नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. मुलांनी त्याचा आनंद लुटला. यानंतर “गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. आठवीच्या विद्यार्थिनी कु.गार्गी काळे व कु. श्रेया झावरे यांनी केले. पाहुण्यांची ओळख. श्रद्धा अल्हाट यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!