ताज्या घडामोडी

माध्यमिक वियालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.

Spread the love

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान दिन दि.२८ फेब्रुवारी मंगळवार उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मुख्याध्यापक पोतदार सर व पर्यवेक्षक जगताप सर ह्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून व नोबेल पारितोषिक विजेते सी .व्ही. रमण आणि विक्रम साराभाई ह्यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान गीताद्वारे व भाषणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व सांगितले.श्री पोतदार सरांनी प्रयोग सादर केला. श्री धोपट सरांनी विज्ञान कवितेचे वाचन केले.शिक्षकांमधून श्री पोतदार सर,श्री. सरगर सर, श्री जगताप सर यांनी आपल्या भाषणातून वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य आणि त्यांचा विज्ञानाशी असणारा शास्त्रीय संबंध स्पष्ट केला.आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान व तंत्रज्ञान महत्त्व वर्णन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सरगर सरांनी केले. यावेळी मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील क्रीडाशिक्षिका आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!