ताज्या घडामोडी

शबे बरात निमित्त दावते इस्लामी तर्फे रत्नागिरीत ईजतिमा चे आयोजन

Spread the love

दावते  इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शबे बरात सणाचे औचित्य साधून दिनांक 7रोजी मदरसा फैजाने अत्तार कोकण नगर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.सदर ईजतिमा ठीक संध्याकाळी 7वाजता नमाजपठण नंतर,नवाफील नमाज, नंतर सूरुवात होईल, या वेळी ईशाची नमाज रात्री 10 वाजता सुरू होईल.तसेच दुसऱ्या दिवशी उपवास (रोजा) सुद्धा पकडला जातो ,या वेळी सर्व मुस्लिम बांधवांना उपवास पकडण्यासाठी सहेरी ची सुद्धा सोय करण्यात आली आहे.मुस्लीम समाजामध्ये हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी मशिदी, स्मशानभूमी यांच्यावर आकर्षक अशी रोषणाई या केली जाते. सर्व गुन्ह्यांपासून मुक्ती मिळण्याची रात्र असल्यामुळे शब-ए-बारातमध्ये अल्लाह कडे प्रार्थना केली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या समाधीवर जाऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दलसुद्धा माफी मागितली जाते.मुस्लीम समाजातील चार पवित्र रात्रींपैकी शब-ए-बारात ही सुद्धा एक पवित्र रात्र असल्याची मान्यता आहे. आशूरा ची रात, शब-ए-मेराज, शब-ए-कद्र, शब-ए-बारात अशा या चार पवित्र रात्री आहेत. या इजतीमा साठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!