ताज्या घडामोडी

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित १५ मार्च रोजी शिराळ्यात सामुदायिक पारायण सोहळा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ अष्टसिध्दमहा शक्तीपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक पिठाधीश प पू श्री गुरूमाऊली (श्री आण्णासाहेब मोरे) यांचे 68 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने 32 शिराळा येथे दिनांक १५ मार्च २०२३ बुधवारी सकाळी ठिक ७:०० वाजता महायोगी श्री गुरू गोरक्षनाथ मंदिर येथे सामुदायिक एकदिवसीय संक्षिप्त 900 श्लोकी नवनाथ पोथी पारायण 11 वेळा श्री कालभैरवाष्टक स्तोत्र पठण 125000 महामृत्युंजय मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र शाबरी मंत्र शिवमहिम्न स्तोत्र पठण इ सेवा प पू श्री गुरूमाऊली यांचे सुआरोग्य दीर्घायुष्य यासाठी संकल्पयुक्त सेवा समस्त सेवेकरी परीवाराचे वतीने करण्यात येणार आहे. या सेवेनंतर महाप्रसाद वस्त्रदान व स्वच्छता अभियान ही सेवा होणार आहे तरी शिराळा वाळवा कराड शाहूवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त सेवेकरी भाविक भक्तांनी या सेवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सेवेकरी परिवार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील जबाबदार प्रतिनिधी पंचकमिटी सांगली जिल्हा ग्राम अभियान टीमचे प्रतिनिधी यांचे वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!