ताज्या घडामोडी

मयेकर महाविद्यालयाची ‘माहेर’ आश्रमाला सदिच्छा भेट….!

Spread the love

रत्नागिरीतील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे कार्यरत असणाऱ्या ‘ महिला विकास कक्षा’ कडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘ माहेर’ आश्रमाला सदिच्छा भेट देण्यात आली. महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या या विभागाद्वारे विद्यार्थिनींच्या सुरक्षितते सोबतच आर्थिक विकासासाठी विविध कला कौशल्यात्मक प्रशिक्षणाचे धडे दिले जाउन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.

तसेच विद्यार्थिनिंना समाजसेवेची जाणीव व्हावी या उद्देशाने विद्यार्थिनींनी आश्रमातील पुरुष, महिला व मुलींसाठी कपडे, बिस्कीट पुडे, शैक्षणिक साहित्य, सॅनिटरी नॅपकिन इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली. आश्रमातील व्यक्तींच्या जीवनाचा प्रवास जवळून पाहण्यासाठी आश्रमाला सदिच्छा भेट देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे समन्वयक श्री कांबळे यांनी संस्थेची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. कविता जाधव, सहाय्यक प्रा. तेजश्री रेवाळे, प्रा. शामल करंडे, प्रा. दिपाली सावंत तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!