आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी,गरवारे ब्लड सेंटर तळेगाव दाभाडे, आणि इंदुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

रक्तदान हे श्रेष्ठ दान...रो. व्हिन्सेंट सालेर..

Spread the love

·रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी,गरवारे ब्लड सेंटर तळेगाव दाभाडे, आणि इंदुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.In association with Rotary Club Talegaon MIDC, Garware Blood Center Talegaon Dabhade, and Endurance Technology Limited, a blood donation camp was concluded on the occasion of Chakan National Safety Week.

आवाज न्यूज : चाकण वार्ताहर, ९ मार्च.

रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी,गरवारे ब्लड सेंटर तळेगाव दाभाडे आणि इंदुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण एमआयडीसी मधील निघोजे येथील कंपनी ऑफिस टाक वर्कर्स लोकांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. दशरथ जांभुळकर यांनी केले. कार्यक्रमाचा मेन उद्देश काय यावर मार्गदर्शन रो. महेश शिंगारे यांनी केले.

अध्यक्ष मनोगतात रो. व्हिन्सेंट सालेर यांनी रक्तदानाविषयी माहिती देत रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे सांगितले तसेच इथून पुढे आम्ही असे कार्यक्रम आपल्या सोबत घेऊ असे सांगितले.सदर कार्यक्रमाची रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो. शंकर हदिमनी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रो .रूथ सालेर,रो. योगेश शिंदे , प्रवीण शिंदे, रोहित भाटकर, राहुल पारगे यांसह गरवारे ब्लड बँकेचे सर्व स्टाफ यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!