आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जागतिक महिला दिनानिमित्त- विजया डायग्नोस्टिक सेंटर व तळेगाव लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने- रक्तदान तथा गर्भवती स्त्रियांसाठी विशेष शिबिर संपन्न!

एक नारी विविध नात्याने मनुष्य जीवन कसे समृद्ध करते याचेही अत्यंत मधाळ शब्दातून आपलं मनोगत व्यक्त केलं!

Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त- विजया डायग्नोस्टिक सेंटर व तळेगाव लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने- रक्तदान तथा गर्भवती स्त्रियांसाठी विशेष शिबिर संपन्न!On the occasion of International Women’s Day – Vijaya Diagnostic Center and Talegaon Lions Club jointly organized a special camp for blood donation and pregnant women!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, ९ मार्च .

तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी– सर्व उपस्थितांच स्वागत केलं! त्यानंतर अध्यक्षांनी- एक नारी विविध नात्याने मनुष्य जीवन कस समृद्ध करते याचही अत्यंत मधाळ शब्दातून आपलं मनोगत व्यक्त केलं.

प्रास्ताविकात ज्येष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी म्हणाले की– आजच्या या समारंभाचे दोन विशेष भाग आहेत! एक म्हणजे- रक्तदान- जे सर्वात श्रेष्ठदान आहे ते आपण करणार आहोत! समारंभाचा दुसरा भाग म्हणजे- गर्भवती मातेने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी हे तज्ञांकडून आपण जाणून घेणार आहोत! त्याबरोबरच सोनोग्राफीच्या माध्यमातून आपलं होणार बाळ आरोग्य संपन्न आहे किंवा नाही? याचंही ज्ञान आपण अवगत करणार आहोत म्हणून हा एक विशेष समारंभ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण आयोजित केलेला आहे.

या दूरगामी फलद्रूप ठरणाऱ्या समारंभास डॉक्टरांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात!यानंतर विजया डायग्नोस्टिक सेंटरच्या रेडिओलॉजिस्ट डॉक्टर दिपाली झंवर मॅडम यांनी गर्भवती स्त्रियांच्या दृष्टीने सोनोग्राफीच किती महत्त्व आहे हे अनेक उदाहरणाद्वारे उपस्थित महिलांना समजावून सांगितलं! गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यातच जन्माला येणाऱ्या अर्भकाच्या बौद्धिक आणि शारीरिक व्यंगाची पूर्ण कल्पना या सोनोग्राफीत आपल्याला येऊ शकते! एवढेच नव्हे तर नैसर्गिक किंवा आवश्यक शस्त्रक्रिये शिवाय आपण डिलिव्हरी करू शकतो का? याचा निर्णय सोनोग्राफीच्या रिपोर्टद्वारा आपण घेऊ शकतो! शेवटी आपण स्वतः आणि इतरांनाही गर्भलिंग परीक्षा कधीच करू देणार नाही –ही शपथ उपस्थित महिलांना डॉक्टर दिपालींनी आपल्या मनोगतात दिली.

गर्भवती स्त्रिया आणि स्त्रियांच्या विविध आजारात- फिजिओथेरपी या क्षेत्रात उच्चपदवी संपन्न केलेल्या- डॉक्टर गिरीजा पाठक मोघे यांनी– गर्भवती स्त्रियांनी करावयाचे व्यायाम आणि घ्यावयाचा आहार -यावर अत्यंत मौलिक विचार आपल्या मनोगतात प्रात्यक्षिकासह व्यक्त केलेत! लायन् राधेश्याम भंडारी यांनी अत्यंत खुशखुशीत शब्दात सूत्रसंचालन केल्याने समारंभाची उंची वाढली.

पिंपरी चिंचवड ब्लडबँकेचे. युवराज बडगुजर यांनी उपस्थितांना आवाहन केल्यानंतर एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने रक्तदानशिबिर हेही खऱ्याअर्थाने यशस्वी झाले! लायन अनिता बाळसराफ यांनी अत्यंत मोजक्या- मधुरशब्दातून आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!