ताज्या घडामोडी

नवी मुंबई नेरूळ येथे ३२ शिराळा प्रीमियम क्रिकेट लीग २०२३ स्पर्धा संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 16 येथील श्री.रामलीला मैदानावर 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित 32 शिराळा प्रीमियम क्रिकेट लीग 2023 च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मेंनी रांजणवाडी येथील मुंबई स्थित साई दत्त परिवाराचे अध्यक्ष उद्योगपती सुरेश भाऊ रांजवण साई दत्त क्रिकेट वॉरियर्स हे विजेते झाले आहेत.

स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे 32 शिराळा प्रीमियर लीग 2023 चा विजेता संघ साईदत्त वारीयर्स टीम मालक सुरेशभाऊ रांजवण व सुनील रांजवण

उपविजेता संघ सरकार 11 संघ मालक नंदू डफळे

3 नंबरचा विजेता संघ अरुणदादा मोहिते संघ मालक अरुण मोहिते

चतुर्थ क्रमांक क्रांती भुमी बिळाशी

रांजवण पुढे म्हणाले की, नवी मुंबई च्या नेरूळ मधील सेक्टर सारसोळे येथील श्री रामलीला मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचा थरार आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये बारा संघमालक यांचे बारा संघ, 180 खेळाडू सहभागी होणार आहेत या 12 संघामध्ये क्रिकेट झाले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख द्वितीय क्रमांक 75000 तृतीय क्रमांक 51 हजार चतुर्थ क्रमांक 31000 अशी असून ही बक्षिसे शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती सम्राटसिंह नाईक भैया, युवक नेते नगरसेवक पृथ्वीसिंग नाईक बाबा, उद्योगपती शंकर दादा मोहिते,यांनी प्रायोजित केली होती.
याबरोबरच खेळाडूंना सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
गेली ३ वर्ष झाली माझ्या साईदत्त वॉरियर्स टीम ला ह्या 32 शिराळा प्रीमियर लीग (SPL) च्या ट्रॉफी ने जी हुलकावणी दिली मात्र यावर्षी ते स्वप्न साकार झाले खरच आज आनंद झाला आहे मी हे सर्व श्रेय टीम च्या सर्व खेळाडूंना देतो व आपल्या मेणीखोऱ्यात ट्रॉफी च आगमन झालं त्याबद्दल अभिनंदन टीम साईदत्त वॉरियर्स… साई दत्त वॉरियर्सचे संघमालक सुरेश भाऊ रांजवण
यावेळी या क्रिकेट स्पर्धेसाठी यशवंत कंधारे आप्पा, विकास शिरसाट अण्णा, वसंत भाडुगळे, विजय पाटील, संदीप खांडेकर राजू मोरे अमोल देसाई साई दत्त वॉरिअसचे आयकॉन प्लेयर निखिल असकट जयस प्लेयर राजू पवार संघनायक अजित चिंचोलकर मिथुन मस्कर अमोल पवार सचिन माने विजय यादव राजू पाटील पप्पू किरण अमर, राहुल, अर्जुन, यश, टीम व्यवस्थापक हणमंत रांजवण, गणेश बेंगडे, आनंद बेंगडे आदी मान्यवर खेळाडू यांचे या स्पर्धेला मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!