ताज्या घडामोडी

दलित महासंघ क्रियाशील व गतिमान करणार – सुधाकर वायदंडे यांचे प्रतिपादन.

Spread the love

शिराळा येथे दलित महासंघाची विभागीय बैठक संपन्न

शिराळा प्रतिनिधी
आदिवासी,बहुजन,दलित लोकांच्या प्रलंबित मागण्यासाठी तसेच समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी दलित महासंघ अधिक क्रियाशील व गतिमान करणार असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी केले.
ते शिराळा येथील दलित महासंघाची नूतन पदाधिकारी निवडी व विभागीय आढावा बैठकीवेळी बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे होते.
बैठकीच्या सुरवातीला दलित महासंघाचे संस्थापक प्रा.मधुकर वायदंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघ ही छ. शिवाजी महाराज,म.फुले,छ.शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर. लो. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारी लढाऊ व आक्रमक सामाजिक संघटना आहे.मजबूत बांधणी करून संघटना गतिमान करणार आहे.
समाजावर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही तसेच युवकांना योग्य शिक्षण व रोजगाराची संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे वायदंडे यांनी सांगितले.
शाखा वाढीसाठी प्रयत्न करणे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे,सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देणे,यासाठी बैठकीमध्ये ठराव करण्यात आले.
यावेळी दलित महासंघाच्या प.महा उपाध्यक्षपदी अनिल आवळे,प.महा.कार्याध्यक्षपदी कृपादन वायदंडे, प. महा.कोषाध्यक्षपदी दिनकर नांगरे, जि.कार्याध्यक्षपदी सुरज कांबळे,युवक जि.कार्याध्यक्ष प्रताप घस्ते,जि.सचिवपदी गोरख लोंढे, वाळवा ता.अध्यक्षध्यक्षपदी नारायण वायदंडे,वाळवा ता.कार्याध्यक्षपदी राजेश वायदंडे,शिराळा ता.उपाध्यक्ष प्रभाकर तांबीरे,शिराळा ता.युवक अध्यक्षपदी सत्कारसिंह गायकवाड,आष्टा शहराध्यक्षपदी छोटू घस्ते यांच्यासह अनेक निवडी करण्यात आल्या.यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रस्ताविक राज लोखंडे आभार सदाभाऊ चांदणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!