आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

उन्नती फाउंडेशनच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन

Spread the love

चिंचवड : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने कोकणातील चिपळूण, महाड व सातारा येथील पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा’ ह्या ब्रीदवाक्याद्वारे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तू तांदूळ, पीठ, डाळ, तेल, मीठ,मसाले, ब्लॅंकेट, पाणी, बिस्किट इत्यादी वस्तू २५ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत मदत स्वरूपात उन्नती फाउंडेशनच्या कार्यालयात जमा करावी असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त बांधवांना आणि परिसरातील नागरिकांना सावरण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यामुळे सर्वांनी पुढे येऊन शक्य तेवढी मदत करावी असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने संजय भिसे व कुंदा भिसे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!