आरोग्य व शिक्षण

भगवंताने गोकुळात सवंगड्यांबरोबर विविध खेळ खेळले त्यातील हाॕकी व चेंडूफळी आज जागतिक पातळीवर पोहोचले – ह.भ.प.बबनमहाराज खेडकर

Spread the love

लोणावळा :  भगवंताने गोकुळात सवंगड्यांबरोबर विविध खेळ खेळले त्यातील हाॕकी व चेंडूफळी आज जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. भगवंताने गायी चारायला गेल्यावर गोकुळात दहीकाला केला, सर्वांना एकसारखा वाटला, तसेच कंस , चाणूर , वज्रदंत या राक्षसांचा वध केला, असे किर्तनकार ह.भ.प. बबनमहाराज खेडकर हे कीर्तनात म्हणाले .

पाटण गावातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित काल्याचा किर्तनात बोलत होते. कोजागिरी पोर्णिमा ते ञिपुरारी पोर्णिमा असा कार्तिकी मासातील काकडाआरती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आबालवृध्द व तरूण यांचेसह महिलांनी काकडाआरतीसाठी तसेच रोजच्या कार्यक्रमानिमित्त परिश्रम घेतले.

यावेळी मृदूंगमणी निलेश साठे यांनी साथसंगत केली.गायक भाऊसाहेब मापारी ,विष्णू बुवा कोंडभर , कैलास केदारी आदींनी चालीसाठी साथ दिली. यावेळी देवाच्या चांदीच्या मुगुटासाठी भरघोस देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रविण तिकोणे , माजी सरपंच गुलाब तिकोणे , उपसरपंच , सर्व आजीमाजी सदस्य , सदस्या उपस्थित होते. सर्वांचे स्वागत माजी सदस्य दशरथ तिकोणे यांनी केले. सूञसंचालन माजी सरपंच गुलाब तिकोणे यांनी केले. पसायदान गायनाचार्य नारायण तिकोणे यांनी गायले.

यावेळी जेष्ठ वारकरी कै.तिकोणे , काकडाआरती चालक वारकरी कै. पोपटराव तिकोणे, उद्योजक कै.कुंडलीक केदारी यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. काल्याचे महाप्रसादाने सांगता झाली. सायंकाळी हारांची मिरवणूक दिडी काढून इंद्रायणीत विसर्जन करण्यात येवून सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!