आरोग्य व शिक्षण

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेचा देशात दुसरा क्रमांक

Spread the love

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराने दुसरा क्रमांक मिळविला आहे.

दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी मुख्याधिकारी रवी पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे लोणावळा शहर स्वच्छ शहर म्हणून देशभर नावारूपास आले आहे. लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सलग चौथ्यांदा पुरस्कार पटकावला आहे. शहरातील नागरिकांनी भविष्यातही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील कचरा घंटागाडीत टाकावा असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे. नगराध्यक्षा जाधव यांनी हा पुरस्कार शहरवासीयांना समर्पित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!