ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिलासादायक; खाजगी शाळांमधील शिक्षण शुल्कात होणार १५ टक्के कपात

Spread the love

मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.या संबंधीचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला. या आदेशानुसार २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात १५ टक्के फी कपात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर ज्या पालकांनी यापूर्वी शाळेची संपूर्ण फी भरली आहे. त्यांना शाळेकडून 15 टक्के फी परत मिळण्याबाबत निर्णय आदेशात नमूद आहे. यामुळे पालकवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. वरील आदेश सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!