आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब व मावळ नागरी सह. पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

Spread the love

तळेगाव : रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी व मावळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन वैयक्तिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

१ ते ४ थी लहान गट,५ ते ७ वी मध्यम गट, ८ ते १० वी मोठा गट अश्या तीन गटात स्पर्धा विभागली आहे.

स्पर्धकांनी देशभक्तीपर दोन ते तीन मिनिटांचे गाणे रेकॉर्ड करून १२ ते २५ ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले रेकॉर्डिंग संयोजक समितीच्या jadhav.sunita2411@gmail.com या ईमेल आयडीवर व्हिडीओ स्वरूपात पाठवावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयी स्पर्धकांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समितीच्यावतीने रोटरी संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, अध्यक्ष सुमती निलवे, उपाध्यक्ष विलसेंट सालेर, सचिव प्रवीण भोसले, प्रकल्प प्रमुख मिलिंद शेलार, सह प्रकल्प प्रमुख लक्ष्मण मखर, मावळ नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, सचिव विलास टकले, सह प्रकल्प प्रमुख पांडुरंग पोटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!