आरोग्य व शिक्षण

खांडशी गावातील वीज मागील तीन दिवसांपासून गायब

Spread the love

कामशेत : नाणे मावळात असणाऱ्या खांडशी गावामध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील तीन दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात असल्याने इथल्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणच्या कर्मचार्यांशी स्थानिक नागरिकांनी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

नाणे मावळातील खांडशी गाव हा डोंगराळ व दुर्गम आहे. इकडे नेहमीच विजेचे तीन तेरा वाजलेले असतात. खांडशी गावामध्ये सुमारे ७५ हुन अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावामध्ये मागील तीन दिवसांपासून अंधार असल्याने गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. पावसाळ्याचे दिवस त्यात विजेचा लपंडाव अश्या परिस्थितीमुळे आम्हाला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडू लागला आहे. गावातल्या बहुतांश अत्यावश्यक सेवा ह्या विजेमुळे बंद असल्याने गावातल्या नागरिकांचे हाल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!