आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

जुन्नर तालुक्यातील आंब्याला ‘शिवनेरी हापूस’ मानांकन मिळवून देण्यासाठी निधी उपलब्ध – अतुल बेनके

Spread the love

जुन्नर : तालुक्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला ‘शिवनेरी हापूस’ मानांकन मिळवून देण्यासाठी व येथील आंब्याची जागतिक पातळीवर नवीन ओळख निर्माण करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अतुल बेनके यांनी दिली.

याबाबत बेनके यांनी कृषी क्षेत्रातील मार्गदर्शकांच्या समवेत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या निमित्ताने जुन्नर पर्यटन संस्थेतर्फे आज बेनके यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच शिवजयंती महोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देऊन कायमस्वरूपी बजेटमधून निधीची तरतूद करण्यात यावी. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल या मागणीसाठी जुन्नर पर्यटन संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ताभाऊ बाळसराफ, डॉ. सदानंद राऊत, प्रा. राधाकृष्ण गायकवाड, शिरीष भोर,यश म्हसकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!