आरोग्य व शिक्षण

रक्षाबंधनानिमित्त तालुक्यातील 2259 महिलांचे कोविड लसीकरण

Spread the love

मावळ : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सोमवारी (ता. 23) रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मावळ तालुका प्रशासनाच्या वतीने केवळ महिलांकरिता लसीकरण मोहीम राबवण्यात आली. संपूर्ण तालुक्यातील 10 केंद्रांमधून 2259 महिलांनी मोहीमेचा लाभ घेत लस घेतली.

यामध्ये तळेगाव 392, कार्ला 200, येळसे 155, आढले 180, खडकाळा 150, टाकवे 150, खंडाळा 120, लोणावळा 540, वडगाव 150, आणि कान्हे ग्रामीण रुग्णालयात 152 महिलांचे लसीकरण करण्यात आले. महिलांनी मोठ्या प्रमाणात केंद्रावर लसीकरणसाठी गर्दी केली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!