आरोग्य व शिक्षण

मुरलीधर मित्रमंडळातर्फे गोकुळाष्टमी निमित्त साधेपणाने कार्यक्रम साजरा

Spread the love

तळेगाव : येथील मुरलीधर मित्रमंडळातर्फे गोकुळाष्टमी निमित्त साधेपणाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुरलीधर महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.अभिषेक व सजावट करण्यात आली. तसेच पहाटे काकडा आरतीचे नियोजन करण्यात आले.

भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे.देशभरात जन्माष्टमी उत्सव मोठया भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी लता चौधरी, सुरेखा चौधरी, रजनी पवार, सविता चौधरी, संगीता पिंगळे, रोहिणी दिघे, प्रिती दिघे, मिराबाई दिघे, दिपाली चौधरी, रुक्मिणी चौधरी, मेघा खळदे, कविता पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन मुरलीधर मित्र मंडळ सर्व कार्यकर्त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!