आरोग्य व शिक्षण

वर्तमान महावीर प्रभू जन्मदिवशी जिवदया दान

Spread the love

तळेगाव : अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ याची स्थापना राजेंद्र शहा कोल्हापूर यांनी केली असून याची शाखा तळेगाव दाभाडे येथे आणण्यासाठी या संस्थेचे संचालक दिलीप शहा व त्यांचे बंधू दिनेश शहा यांनी परिश्रम घेतले.विशेष म्हणजे या गुजराती समाज महासंघाच्या सर्व शाखा या महिला चालवितात.

तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुजाता शहा आहेत. पूर्वजणांनी गौशाळा व पांजरपोळ काढल्या आहेत. त्यांना सहकार्य करणे हे जैन धर्मात मोठे कर्तव्य मानले जाते. आणि हेच औचीत्य साधून जैन धर्माचा सर्वात मोठा सण पर्वपदुसणमध्ये मंगळवार (दि. सप्टेंबर) रोजी वर्तमान महावीर प्रभू जन्म वाचन दिवशी तळेगाव मधील व पंच कोशितील दानशूर श्रावक संघवी सुमतीलाल ताराचंद शहा यांनी पाबळ येथील पद्दमणी तिर्थ संचालित पांजरापोल संस्थेत २५ टन चारा पाठवला.

या जिवदया अभियान होण्यासाठी  गुजराथी महासंघाचे तळेगाव शाखेचे जिवदया सदस्य अस्मिता नितीन शहा व माधुरी नितीन शहा यांनी काम केले. दिलीप शहा यांनी संघवी सुमतीलाल ताराचंद शहा यांचा सत्कार केला. तसेच या गुजराथी महासंघातर्फे स्व.चंद्रवतीबेन पोपटलाल शहा व श्रीमती कुसुमबेन शांतीलाल शहा यांनी गोरगरिबांना अनुकंपा दान करण्याचा लाभ घेतला. तर या शाखेचे अध्यक्ष सुजाता शहा यांनी अस्मिता शहा व माधुरी शहा यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!