आरोग्य व शिक्षण

लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष रामकिशोर गुप्ता यांचे निधन

Spread the love

लोणावळा : लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष रामकिशोर गुप्ता यांचे सोमवार (दि.२७ सप्टेंबर)  रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांचे पश्चात तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी , चार विवाहित भाऊ , सुना , नातवंडे असा परिवार आहे.

लोणावळा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपशेठ रामकिशोर गुप्ता हे त्यांचे सुपुञ होत. कै.गुप्ता यांचे पार्थिवावर ता.२८ रोजी चार वाजता कैलासनगर स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि नगरसेवक निखिल कविश्वर यांनी यावेळी श्रध्दांजलीपर भाषणे केली.

कै.रामकिशोर गुप्ता यांचे कार्य: सन १९५९ मधे कै.रामकिशोरजी गुप्ता हे लोणावळा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळामधे सदस्य म्हणून राजकारणात पदार्पन केले. १९६५ पासून १९९९ पर्यत ते लोणावळा नगरपरिषदेच्या विविध खात्यामधे त्यांनी विविध विषय समितीचे सभापती , उपनगराध्यक्ष व दोनवेळा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. लोणावळा नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब डहानूकर रूग्णलयाचे काम नगरपरिषदेच्या काहीही खर्च न करता त्यांचे काळात झाले. रेल्वेवरील गवळीवाडा येथे जाणारा पूल , छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा , तसेच कुमकुम समोरील महात्मा गांधी रस्त्याच्या कामाबाबत रेल्वेकडून आंदोलन करून रस्ता घेतला.

लोणावळ्यातील पाणीपुरवठ्यासाठी योजनेच्या जलवाहिनी , भुयारी गटार योजना मार्गी लावल्या . कै.रामकिशोर गुप्ता यांचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण , वसंतदादा पाटील आणि शालीनीताई पाटील तसेच केंद्रीय मंञी शरदचंद्रजी पवार यांचेबरोबर निकटचे संबंध होते. खंडेलवाल , आगरवाल यांचे वैश्यसमाज संघटनेचे ते सदस्य होते. वसंतदादा पाटील चे राज्यपाल असताना जयपूर येथे वैश्यसमाज संघटनेच्या इमारतीचे करीता जयपूर येथे नाममाञ भाड्याने जागा मिळवून दिली.आखिल भारतीय वैश्य महासभा कार्यकारी सदस्य तसेच मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!