आरोग्य व शिक्षण

देहूरोडमध्ये कोविड महालसीकरण अभियानात 3553 जणांचे लसीकरण

Spread the love

देहूरोड : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या सहकार्याने देहूरोड कन्टोनमेंट परिसरातील नागरिकांसाठी काल (30 सप्टेंबर) रोजी महालसीकरण अभियान राबविण्यात आले.

या अभियानाअंतर्गत एकूण 3553 जणांचे लसीकरण करण्यात आले. यात 2621 जणांना कोविशिल्ड व 932 जणांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला.

येथील आरोग्य विभाग, खाजगी हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व सुनिल अण्णा शेळके युवा मंचचे पदाधिकारी यांनी या लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य केले.

यावेळी अॅड. प्रवीण झेंडे,ॲड. कृष्ण दाभोळे, हाजीमलंग मारूमुत्तू, भरत नायडू, परशुराम दोडमणी, अतुल मराठे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!