आरोग्य व शिक्षण

लायन्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Spread the love

तिकोना : लायन्स क्लब पुणे प्राधिकरणाच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी तिकोनापेठ गावातील पहिली ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पॅड, पुस्तके,कम्पाॅस व चित्रकलेचे साहित्य देण्यात आले. तसेच शिवसागर मधमाशीपालन पुस्तके व मध वाटप केले. प्रत्येक विद्यार्थ्याला झाडाचे रोप देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी हरि नायर, विजय सूद, अध्यक्ष भूपेंद्रसिंग डुल्लत, मिलिंद मांढरे, पंकज फिरके, जयकुमार गोगावले, विशाल महाजन, तिकोनापेठ गावच्या सरपंच ताराबाई बोडके, उपसरपंच ज्ञानदेव मोहोळ, चंद्रकांत भालेराव, सुरेश मोहोळ, उमेश मोहोळ, पुंडलिक मोहोळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम पार पाडण्यास नीता महाजन व शुभांगी गोगावले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!