आरोग्य व शिक्षण

तळेगावात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

तळेगाव : येथील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. ज्यांनी वयाची 75 व 81 वर्षे पार केली आहेत अशा मंडळातील ज्येष्ठांचा अमृतमहोत्सवी व सहस्त्रचंद्रदर्शनयोगी सत्कार समारंभ ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.

या कार्यक्रमाअंतर्गत सिद्धार्थ किल्लावाला यांच्या हस्ते श्रीफळ व डॉक्टर भंडारी लिखित पुस्तक, भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ब्रिजेश किल्लावाला यांनी मंडळाने ही संधी दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.

डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी मनोगतात विविध दृष्टांत देत काव्याचा आधार घेऊन नित्य स्मरण ठेवायच्या गोष्टी म्हणजे मरणाचे स्मरण आणि दातृत्वाची जाणीव.मनात कटूता निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आणि दानाला विसरा आपण जर या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर प्रत्येकाला आपल्या मौल्यवान अशा उर्वरित निरोगी निरामय दीर्घायुष्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, हे प्रेक्षकांना पटवून दिले.

मंडळाचे अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर यांनी सर्वांचे स्वागत केले. राधेश्याम भंडारी यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार विठ्ठल कदम, चिटणीस गीता बालावकर, प्राची साठे, प्रदीप साठे, दिगंबर कुलकर्णी, दीपक जयवंत व लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी समारंभ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!