आरोग्य व शिक्षण

कामशेतच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

Spread the love

कामशेत : पंतप्रधानांपासून ते गावपातळीपर्यंत सर्वच जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र कामशेतकर काही ऐकायला तयार नाहीत. फिजिकल डिस्टन्सची तर त्यांनी ऐशी तैशी करून ठेवली आहे. कामशेत मधील बँक ऑफ महाराष्ट्र समोर तर ग्राहकांनी कहरच केल्याचे दिसून आले.

गेल्या दोन दिवसांपासून सरकारी सुट्ट्यांमुळे बँका बंद होत्या. सोमवारी बँक उघडताच ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी एकच गर्दी केली. कामशेत शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. बँकेत एकावेळी केवळ चारच ग्राहकांना सोडण्यात येत होते तरी देखील बँकेबाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे असल्याचे चित्र दिसत होते. त्यांना ना कोरोनाची भीती दिसत होती ना आपल्या कुटुंबाची चिंता वाटत होती. अश्यातच कामशेतच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकांनी तर कोरोनाचे नियम पाळायचे नाहीतच असे दिसत आहे.

बँकेबाहेर बँकेने कोरोनाप्रतिबंधक उपाय केल्याचे आढळून आले नाही किंवा फिजिकल डिस्टन्स निर्देशित करतील असे फलक देखील यावेळी लावलेले आढळून आले नाहीत.

ह्यावर कामशेत मधील युवा उद्योजक अनिरुद्ध अंबर्डेकर म्हणतात, मागील दोन दिवस सरकारी सुट्टी असल्याने बँका बंद होत्या त्यामुळे व्यवहार देखील ठप्प झाले होते त्यात आज सोमवार व महिन्यातील पहिला आठवडा त्यामुळे नोकरदार वर्ग, पेन्शनधारक यांची कायमच झुंबड उडत असते ह्यावर बँकेने काहीतरी उपाययोजना करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!