आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

औंढे – औंढोली गावात बैलपोळा सण उत्साहात संपन्न

Spread the love

लोणावळा : औंढे खुर्द व औंढोली गावात बैलपोळा सण बैलजोड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.

औंढोलीत पोलिसपाटील गुरूनाथ तुकाराम मांडेकर यांच्या बैलजोडीने प्रथम प्रदक्षिणा घातल्यानंतर बैलजोड्यांना घेवून तरूण शेतकऱ्यांनी श्री हनुमान व श्री शिव मंदिराला प्रदक्षिणा घातली. गावातल्या सुमारे बारा ते चौदा बैलजोड्या मिरवणूकीमधे सहभागी झाल्या होत्या .

काही शेतकऱ्यांनी नवीन बैलांना बाशिंग , गौंडे , लावून त्यांचे शिंगांना बेगड , अंगावर भंडारा व गुलाल टाकून मिरवणूक काढली. औंढे खुर्द , खाडेवाडीत खिल्लारी बैलजोड्या व गावरान बैलजोड्या बैलपोळामधे सहभागी झाल्या होत्या .

महिलांनी बैलांना ओवाळून पुरणपोळी खाऊ घातली. प्रसिद्ध गाडामालक अनंता खाडे यांचे खिल्लारी बैलजोडी गौंडे , बाशिंग , फुगे यांची मोठ्या सजावटीत बैलांची मिरवणूक काढली होती. यावेळी बँजो पथक लावून मिरवणूक काढली. पाऊस ऐनवेळी येवून गेल्यावर मिरवणूक पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!