आरोग्य व शिक्षण

आंबी येथे अमृतवेल योगोपचार व निसर्गोपचार केंद्र पुन्हा नव्याने सुरु

Spread the love

तळेगाव : येथे  घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी  योग विद्या गुरुकुल नाशिक यांचे मान्यता प्राप्त अमृतवेल योगोपचार व निसर्गोपचार केंद्र आंबी, तळेगाव दाभाडे  येथे पुन्हा नव्याने सुरू झाले आहे.

या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे,उद्योजक विलास काळोखे, दिलीप पारेख, विश्वास देशपांडे, माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, शाहीन शेख,ज्योती देशपांडे यांनी केले.

यावेळी  उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना या केंद्राचे मार्केटिंग चॅनल पार्टनर नितीन भाई शहा यांनी केले व आयुर्वेदाविषयी माहिती दिली. तर अमृतवेल या केंद्राची संपूर्ण माहिती या केंद्राचे प्रमुख हरिश्चंद्र गडसिंग यांनी दिली.

या वेळी बोलताना भगतसिग  यांनी सांगितले की,आपण दरोरोज घेत असलेले अन्न,पाणी,हवा हे किती प्रदूषित आहे.त्यामुळे शरीरात निर्माण होणारे विष हे आपली रोग प्रतिकार शक्ती नष्ट करते.  आपण जीव घेणाऱ्या आजारांना बळी पडतो व अशा नैसर्गिक वातावरणात स्वतः ला उत्तम व निरोगी आरोग्य देण्याची वेळ आली आहे. अमृतवेल योगोपचार व निसर्गोपचार केंद्र व पंतप्रधान योग पुरस्कारने या गुरुकुलचे डॉ. विश्वास मंडलिक यांना सन्मानित केले आहे. या केंद्रात निरनिराळ्या थेरपीने व तज्ञ डॉकरांच्या सल्याने शरीराचे शुध्दीकरण करून मिळेल. यामध्ये प्रामुख्याने -योग उपचार,योग साधना, वैद्यकिय /नाडी तपासणी, आयुवैदीक काढा,संपूर्ण बॉडी मसाज,स्टीम बाथ,जलबस्ती/एनिमा,अभ्यंगस्नान,निसर्ग अल्पोहार, कास्यथेरपी, मडलेप, मॅगनेटथेरपी, प्राणायम व ध्यान धारणा, मडबाथ, सनबाथ,शिरोधारा योगाचार्य वरील शुध्दीकरण वर्षातून तीन वेळा यामध्ये एक दिवसीय व दोन दिवसीय( मुक्कामी)आहे.  तसेच

स्पॉडीलाटीस,सायटीका,स्लीपडिस्क,पाठदुखी,संधिवात,उच्चरक्तदाब,मधुमेह,दमा,हृदयविकार,पचनतक्रारी,डोकेदुखी,अँसिडीटी,अल्सर,महिलांचेविकार,मनोकायिक विकार,मुतखडा,स्ट्रेस, वेटलॉस
वर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभेल.तसेच या आजारांवर येथे उपचार केले जातात.

विश्वास देशपांडे,दिलीप पारेख,सुरेश धोत्रे यांनी अमृतवेल मध्ये योग उपचार घेतला व त्यांचा अनुभव सांगून सर्व नागरिकांना आपले शरीर शुध्दीकरण करून घ्या असे आवाहन केले .

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या संस्थेचे मार्केटिंग पार्टनर शितल शहा,राधा सोनी,वंदना शहा,शहीन शेख,अमृता मोरे,ज्योती देशपांडे,तानाजी मराठे,प्रदीप टेकवडे यांचा सत्कार हरिश्चंद्र गडसींग व सुरेश धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार या केंद्राचे तज्ञ डॉ. लोळके यांनी मानले.कार्यक्रमाला  नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!