आरोग्य व शिक्षण

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा

Spread the love

चिंचवड  : चिंचवड मधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या उत्तम प्रतिसादात नवरात्र शारदीय उत्सवानिमित्त ऑनलाईन ‘दांडिया स्पर्धा’ खूप उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ११ वी ,१२ वी कला,वाणिज्य,व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन दांडियाचा आनंद घेतला.कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेमुळे कोविडच्या काळात कंटाळवाणे, निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण झाला.

या स्पर्धेसाठी डॉ.निजी शाजान, क्षितिजा मेहेर,डॉ.पौर्णिमा कदम, प्रा.रिबिका पॉल यांनी परीक्षक म्हणून काम केले. या स्पर्धेतुन एकूण वीस सहभागी गटातून प्रथम तीन क्रमांक काढले. प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक म्हणून फिरता करंडक ठेवण्यात आला होता. तो मिळविण्याचा मान १२ वी कॉमर्स ‘ड’ या वर्गाने मिळविला.तर दुसरा क्रमांक नुकत्याच प्रवेश घेतलेल्या ११ वी विज्ञान ‘ अ ‘ वर्गाने मिळविला व तिसरा क्रमांक ११ वी विज्ञान ‘ड’ या वर्गाने मिळविला. विजेत्या गटास महाविद्यालयात बोलावून प्रथम क्रमांकास फिरता करंडक आणि द्वितीय व तृतीय क्रमांकास सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ.दिपक शहा, प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन विद्यार्थ्यांबरोबर डॉ.ब्रिजेश सर ,प्रा.चिन्मयी जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन समन्वयीका डॉ.सुनीता पटनाईक आणि प्रा. जास्मिन फरास यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!