आरोग्य व शिक्षण

तानाजी पारगे यांना जोशी समाज भूषण पुरस्कार

Spread the love

तळेगाव : महाराष्ट्र प्रदेश जोशी समाज समितीच्या वतीने जोशी समाज भूषण पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील तानाजी पारगे यांना देण्यात आला.

शुक्रवार (दि. 18 ऑक्टोबर) रोजी एरंडवणे, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात तानाजी पारगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश जोशी समाज समितीचे अध्यक्ष निलेश पारगे यांनी दिली.

अनेक वर्षापासून केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी समाजाचा सदैव ऋणी राहील अशी भावना तानाजी पारगे यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय ओंबसे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा कोषाध्यक्ष शैला मोळक, प्रदेशाध्यक्ष दिलीप परदेशी, तानाजी खेडेकर, नंदकुमार जोशी, योगेश पारगे, नगरसेवक सुनील कारंडे, संदीप जोशी, नंदकुमार खेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पारगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!