आरोग्य व शिक्षण

कार्लाच्या श्री एकविरा गडावर भाविक भक्तांची मांदियाळी

१४ ऑक्टोबर रोजी पहाटे अभिषेक , होमहवन होणार संपन्न

Spread the love

लोणावळा : कार्लाच्या श्री एकविरा गडावर भाविक भक्तांची मांदियाळी आहे.ता.१४ रोजी पहाटे अभिषेक , यज्ञ होमहवन होणार असल्याचे श्री एकविरा देवीचे गुरव पुजारी भगवान देशमुख आणि राजू देशमुख तसेच यावर्षीचे होमहवनचे मानकरी संतोष देशमुख यानी सांगितले .

ता.७ घटस्थापनेपासून राज्य सरकारने सर्व मंदिरे उघडण्याचे आदेश दिल्याने पहिल्या दिवसापासून गर्दी होत आहे. या श्री एकविरा देवीच्या मंदिरात पुजारी देवीच्या पूजेचे कार्य गेली अनेक शतके करत आहेत. मंदिरात भाविक भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे व पंचवीस अधिकारी आणि १२५ पोलिस कर्मचारी बंदोबस्त राञंदिन ठेवत आहेत.

गडावर रिक्षा,व चारचाकी , दुचाकी वाहने ठराविक आंतराने सोडत आसून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनिवर्धकाची व सीसी टीव्ही कॕमेरे यांची मदत घेतली जात आहे.

बुधवारी मध्यरात्रीनंतर ता.१४ रोजी घट उठतात. पहाटे १ वाजता सप्तशतीचा पाठ सांगता होते. नऊ दिवस हा पाठ चालतो. पहाटे ३ अभिषेक व काकडा आरती होते. पहाटे ५ वाजता होमहवन मुख्य पुजारी यावर्षीचे मानकरी संतोष देशमुख व सौ.अनिता देशमुख यांचे हस्ते होणार आहे.

मंदिरात पुजारी म्हणून भगवान देशमुख , ,राजू देशमुख , अरूण देशमुख, काशिनाथ देशमुख ,क्रूशिकेश देशमुख, आदित्य देशमुख, संदिप देशमुख, शंभु दत्ताञेय देशमुख, गणेश लक्षण देशमुख, शंकर ज्ञानेश्वर देशमुख आणि स्वप्निल सुनिल देशमुख करीत आहेत.

श्री एकविरा देवीचे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी एका राञीत बांधले आहे. आई श्री एकविरा देवीचे स्वयंभू मुर्ती मंदिरात पाषाणातून प्रकट झाली आसून तिच्या समोर डाव्या हाताला तिची भावजय देवघरची श्री काळभैरवनाथ देवाची पत्नी श्री जोगेश्वरी आहे. ती ननंदेला भेटण्यासाठी श्रीएकविरा मंदिरात आली व येथेच विसावली .दोघींचीही नित्य पूजा , व आरती सकाळ व राञी सात वाजता होते, असे गुरव पुजारी यांनी सांगितले .

गडावर चढण्यासाठी ३६० दगडात पायऱ्या आहेत.मंदिरासमोरच कार्लाची लेणी असून ता.७ पासून लेणीही पहावयास खुली आहे. गडावर पिण्यासाठी शुध्द पाणी ,  तसेच मंदिरात देवीला ओटी , हार,नारळ व प्रसाद आदी नेण्यासाठी लेणीचे समोर प्रवेश दारापर्यत दुतर्फा दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत.

गडावर व मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्तीचा केला आसून लहान मुले व वयोवृध्द यांना प्रवेश नाही. पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी विशेष एस आर पी पथकही नेमलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!