आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब आयोजीत गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर

Spread the love

तळेगाव : येथील रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम. आय. डी. सी . च्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या  मावळ तालुका शालेयस्तरीय ऑनलाइन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा  निकाल जाहीर करण्यात आला आहे.

रोटरी क्लबने या स्पर्धेचे  आयोजन केले होते . या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रोटरी क्लब तर्फे स्पर्धेचा निकाल रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम. आय. डी. सी. चे संस्थापक अध्यक्ष  संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब अध्यक्ष सुमती निलवे व प्रकल्प प्रमुख  मिलिंद शेलार यांनी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे निकाल जाहीर केला.

 

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगांव दाभाडे येथील कै. मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न होणारअसल्याचे रोटरी क्लब ऑफ तळेगांव एम. आय. डी. सी. अध्यक्ष  सुमती निलवे व सचिव प्रविण भोसले यांनी सांगितले.

 

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे…
इयत्ता १ली ते ४ थी गट
१)प्रथम क्रमांक – निकुंज हिवराज शरणागत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी
२)द्वितीय क्रमांक – स्वरा राहुल पवार – स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे,
३)तृतीय क्रमांक -श्रेयस महाले -आदर्श विद्यालय तळेगाव दाभाडे
४)उत्तेजनार्थ – श्रीयुक्त जगताप – माउंट सेंट अँन स्कूल तळेगाव दाभाडे

इयत्ता ५ वी ते ७ वी गट
१)प्रथम क्रमांक – रुद्राक्ष चेतन जाधव – कृष्णराव भेगडे स्कूल तळेगाव दाभाडे,
२)द्वितीय क्रमांक – सृष्टी विजय खांजोडे – स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल- तळेगाव दाभाडे
३)तृतीय क्रमांक – अथर्व विश्वनाथ ढोरे -प्रगती विद्या मंदिर इंदोरी
४)उत्तेजनार्थ – कावेरी ठाकर – पवना विद्या मंदिर पवनानगर

इ. 8 वी ते 10 वी गट
१)प्रथम क्रमांक – साईराज तसनुसे –
नवीन समर्थ विद्यालय तळेगांव दाभाडे
२)द्वितीय क्रमांक – कु. श्रेया नवनाथ घरदाळे –
पवना विद्या मंदिर पवनानगर
३)तृतीय क्रमांक – तमन्ना सय्यद –
पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे,
४)उत्तेजनार्थ – लयकाशा चांदबाशा शेख – कन्या शाळा क्रमांक ४ तळेगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!