आरोग्य व शिक्षण

मावळ तालुका इतिहासाचा बालेकिल्ला – डॉ. प्रमोद बोराडे

Spread the love

साते : मावळ तालुका इतिहासाचा बालेकिल्ला आहे. प्राचीन इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचावा या दृष्टीने मावळ तालुक्याचा विकास होणे गरजेचे आहे असे वक्तव्य व्याख्याते इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांनी साते गावातील कार्यक्रमात केले.

सातेगाव हे थोरले नानासाहेब पेशवे यांचे जन्मस्थान.नानासाहेब हे पेशवाईत 21 वर्षे पंतप्रधान होते. या काळात त्यांनी अनेक लढायांमध्ये आपले कर्तृत्व गाजवले. नाना साहेबांचा जीवनपट सर्वांना कळावा यासाठी सातेगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती त्यांनी दिली. यानिमित्ताने साते गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना, पौराणिक, प्राचिन, मध्ययुगीन व अर्वाचिन इतिहास लाभलेला मावळ तालुका आज इतिहास जिवंत ठेवतो आहे. बहुतांश गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आणि स्मारक तयार होत आहेत.ब्रिटिशांवर मराठ्यांनी मिळविलेला विजय स्मरणात ठेवून खंडाळ्याच्या तळ्यावर, किल्ल्याच्या  तळ्यावर, तळेगाव दाभाडे मधील विजय खिंडीत नवी विजय स्मारके आकार घेत आहेत.

वडगाव मावळ या गावात या महान विजयाचे स्मारक पूर्वी महादजी शिंदे यांचा उत्कृष्ठ पुतळा बसवून झालेले आहेच.तळेगाव दाभाडे मध्ये प्रवेश करत असताना श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे अशी नावे कमानीवर आणि या ऐतिहासिक आणि भव्य कमानीच्या छत्रछायेमूळे तळेगाव दाभाडे मधील सुजान नागरिकाना आपल्या शहराची वेगळी ओळख दिसून येणार आहे.शिवशंभू स्मारकाचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे. हे स्मारक मावळ तालुक्याचा अभिमान असणार हे निश्चित आहे.

छत्रपती शिवाजी या चित्रपटगृहात  चतुर्भुज डांगे यांनी घडविलेला भव्य पुतळा सर्वान्च्या श्रद्धेचा विषय ठरला आहे

मावळात आज गड भटकन्ती संस्थेमार्फत  तिकोना याचे उत्तम संवर्धन सुरु आहे. कठीणगड , तुंग येथे सह्याद्रि प्रतिष्ठानच्या अंतर्गत भव्य काम सुरु आहे. लोहगड, विसापुर विकास मंचच्या माध्यमातून वरील दोन्ही दुर्गावर कामे सुरु आहेत. बदरंगदल – विश्व हिंदू परिषदने कित्येक ऐतिहासिक परंपरा नव्याने सुरु केल्या आहेत.

लोणावळा येथे आमच्या शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाने कात टाकली आणी भव्यतेत शेकडो लोक हे नव्याने उभे राहिलेले संग्रहालय पाहून इतिहास समजुन घेतात. मावळात उभे राहिलेले प्रथम संग्रहालय म्हणून त्याचा मान कायम राहील.मावळात येणा-या पर्यटकांना  अभ्यासकांना व इतिहास प्रेमी व्यक्तिना या सर्व बाबी पाहून जिवनाचे सार्थक झाले असे वाटेल.अशी मावळ तालुक्याच्या ऐतिहासिक  वारश्याची माहिती त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!