आरोग्य व शिक्षण

चिंचवड येथील आनंदनगर आणि साईबाबानगर मधील नागरिकांना लोहमार्ग ओलांडण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा – काळुराम पवार

Spread the love

चिंचवड : स्टेशन भागातील प्रभाग क्रमांक 19 मधील आनंदनगर आणि साईबाबा नगर मधील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना लोहमार्ग ओलांडण्यासाठी पर्याय रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विधी समितीचे सभापती काळुराम पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आनंदनगर व साईबाबा नगर भागात जवळपास 20 हजारांवर लोकसंख्या आहे. परंतु या भागातील नागरिकांना कामानिमित्त उपनगरात जाण्यासाठी जीव धोक्यात घालून मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. कारण रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध नाही. उलट या ठिकाणी सीमाभिंत बांधून रहिवाशांना नाहक मनस्ताप दिला आहे. अनेकवेळा या ठिकाणी गंभीर अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!