आरोग्य व शिक्षण

देहूमध्ये आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

देहू : श्री क्षेत्र देहू येथे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक 2021’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समस्त देहू ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक  आमदार सुनिल आण्णा शेळके यांची बैलगाडीतून मिरवणूक काढुन स्वागत करण्यात आले. तसेच श्री क्षेत्र देहुगाव बैलगाडा संघटना व अमोलदादा काळोखे मित्र परिवार यांच्या वतीने आमदारांना भेट म्हणून वाढदिवसानिमित्त गोमाता (गाय) देण्यात आली.

आमदार सुनील शेळके यांनी या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहुन प्रथम क्रमांक विजेत्या स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से या संघासह इतर सर्व विजयी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे आयोजक महाविकासआघाडी देहू शहर,आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच देहू, देहू इलेव्हन अर्थात स्व.ॲड.प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन व इतर सर्वांचे आमदारांनी आभार मानले

या कार्यक्रमावेळी आमदार सुनील शेळके, अध्यक्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान ह.भ.प.नितिनमहाराज मोरे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, रत्नमाला करंडे, उषा चव्हाण, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेब काळोखे, अध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस वैशाली टिळेकर, ह.भ.प.संतोष महाराज काळोखे, विश्वस्त ह.भ.प.संतोष महाराज मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश परंडवाल, शिवसेना शहर प्रमुख सुनिल हगवणे, नगरसेविका संगीता शेळके, पत्रकार राजेंद्र काळोखे, माजी सरपंच अशोक राजिवडे तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!