आरोग्य व शिक्षण

पेट्रोल, इंधन दरवाढी विरोधात युवासेनेचे सायकल रॅली आंदोलन

Spread the love

लोणावळा: शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य  ठाकरे व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आज एकाच वेळी सर्व युवा सैनिक पेट्रोल इंधन दरवाढ विरोधात राज्यव्यापी सायकल रॅली काढुन आंदोलन करून निदर्शने केली.

याचाच एक भाग म्हणून युवासेना मावळ लोकसभा विस्तारक राजेशजी पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेना मावळ विधानसभेच्या वतीने सायकल रॅली काढुन आंदोलन करण्यात आले.यावेळी जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वरसोली टोल नाका मावळ ते हिंदुस्थान पेट्रोलियम पंप लोणावळा पर्यंत सायकल रॅली काढुनी घोषणाबाजी करण्यात आली.  पेट्रोल पंप येथे शाम सुतार युवासेना अधीकारी मावळ विधानसभा, बाळासाहेब फाटक, युवासेना पुणे विद्यापीठ उपाध्यक्ष विशाल हुलावळे, उपशरप्रमुख संजय भोईर, युवासेना विभाग अधिकारी नितीन देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेना लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी, युवासेना आय.टि.सेल अधीकारी राकेश कालेकर, युवासेना चिटणीस विनायक हुलावळे, सरचिटणीस प्रसाद हुलावळे उपशहर अधीकारी ओमकार फाटक,विवेक भांगरे, विभाग अधिकारी राजेश फुणसे,महेश येवले, आदित्य हुलावळे, आर्यन हुलावळे,सचिन शिर्के,सागर घोलप,मारूती देवकर इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!