आरोग्य व शिक्षण

दीड वर्षानंतर पुन्हा भरणार लोणावळ्यातील आठवडे बाजार

प्रशासनाच्या निर्णयाचे नागरिकांनी केले स्वागत

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहरात शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार जवळपास दीड ते पावणेदोन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा सुरू होणार आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोने महामारीच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद करण्यात आला होता. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी हनुमान टेकडी येथील नवीन रस्त्यावर बाजार पुन्हा भरविण्यात येणार आहे. नुकतेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते.

सध्याच्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर त्रस्त झालेल्या नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. लोणावळ्यातील भाजी मार्केटमधील भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य व गरीब नागरिक बेजार झाले आहेत.रोजचा महागडा भाजीपाला घेणे त्यांना शक्य नाही.त्यामुळे आठवडे बाजार पुन्हा सुरू करण्याच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!