आरोग्य व शिक्षण

पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे मागितली 14 कोटींची खंडणी

Spread the love

तळेगाव : भागीदारीत व्यवसाय करत असताना आर्थिक कारणांवरून झालेल्या वादातून एका भागीदारावर खोटे गुन्हे दाखल केले. तसेच कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी महिलेवर दबाव आणून महिलेच्या भागीदार पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे 14 कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रसिका रोहन भालेराव (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद भागवत पोखरकर, मोनिका मिलिंद पोखरकर, मनोदीप चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 जून 2019 ते 9 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करत होते. फिर्यादी यांचे पती आणि आरोपींनी भागीदारीतील व्यवसायासाठी जी एस महानगर बँक, तळेगाव दाभाडे शाखा येथून अडीच कोटींचे कर्ज घेतले. सर्व भागीदार हे कर्ज फेडणार होते. मात्र आरोपींनी कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली. भागीदारी कंपन्यांच्या चर्चेसाठी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना घरी बोलावले आणि तेथे फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांशी एकत्रित चर्चा करून झाल्यानंतर दोन वर्षांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर मिलिंद पोखरकर यांच्या बँक खात्यावर अपुरे पैसे असल्याने बँकेचे दोन चेक बाऊन्स झाले. याबाबत फिर्यादी यांनी मिलिंद पोखरकर यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. फिर्यादी यांनी याचिका मागे घेतली नाही. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीवर खोटे गुन्हे दाखल केले.

फिर्यादीत म्हटले आहे की, मार्क कन्स्टोरियम सेरेनिया काउंटी प्रकल्प मौजे कुडली, ता. रोहा, जि. रायगड येथील मिळकत विनामोबदला मोनिका मिलिंद पोखरकर यांच्या नावे करणे. मार्क डेव्हलरमधून यशवंतनगर प्लस प्रकल्पातील फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे हक्क विनामोबदला मिलिंद पोखरकर यांच्या नावाने करणे. मार्क लॅण्डमार्क वर्मा प्लॉटमधील फिर्यादी आणि त्यांच्या पतीने हक्क सोडणे व डुंबरे यांचे देणे अदा करणे तसेच त्यांचे हक्क मिलिंद पोखरकर यांच्या नावे करणे. मार्क इन्फ्रास्ट्रक्चर, मार्क इन्फ्रा प्रोजक्ट, मार्क रियास व मार्क रियालिटी या कंपनीमधून मिलिंद पोखरकर, मोनिका पोखरकर, अतुल पोखरकर यांना कंपनीमधून निवृत्ती देऊन त्यांचे विविध अँटीज नोंदी करून त्यांचे सर्व देणी स्वीकारण्यावरून नुकसान वेव्ह ऑफ करणे. मिलिंद पोखरकर, मोनिका पोखरकर कुठल्याही प्रकारचे देणे फिर्यादी आणि त्यांच्या पतीला देणे लागत नाही. चेक बाउंस प्रकारची केस मागे घेणे. मिलिंद पोखरकर, मोनिका पोखरकर, अतुल पोखरकर यांचे सर्व वैयक्तिक फिर्यादी आणि त्यांच्या पतीला असलेले एक कोटी रुपयांचे देणे माफ करणे व फिर्यादी व त्यांची पतीने हक्क सोडणे.

मिलिंद पोखरकर, मोनिका पोखरकर, अतुल पोखरकर यांनी फिर्यादी यांच्या भागीदार संस्थेतील फिर्याद व त्यांच्या त्यांच्या पतीच्या संमतीशिवाय केलेली कागदपत्रे दस्त देयक, सरकारी कागदपत्रे, जीएसटी कर इत्यादी देणे मान्य करणे अशा प्रकारची कागदपत्रे बनवून त्यावर फिर्यादी यांना सह्या करण्यास सांगितले. मात्र त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. मिलिंद पोखरकर यांनी फिर्यादी यांच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेणार नाही. तसेच आणखी खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी देत वारंवार फिर्यादीकडे 14 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!