आरोग्य व शिक्षण

स्वा. सावरकर चौक असे भंगारवाडी चौकाचे नामकरण करा – प्रदीप थत्ते

Spread the love

लोणावळा : भांगरवाडी येथील लोहगड उद्याना समोरील चौकाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

लोहगड उद्यान सुशोभिकरणाचे काम सध्या नगर परिषदेने हाती घेतले आहे. याठिकाणी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उद्यानात बसवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या सतत गजबजलेल्या चौकाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्षा, गटनेते, विरोधी पक्ष नेते व नगर परिषद प्रशासन याच्याकडे थत्ते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!