आरोग्य व शिक्षण

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकात असलेल्या हजारो कुटुंबाची उपासमार

Spread the love

लोणावळा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकात असलेल्या हजारो कुटुंबाची उपासमार होत असून अनेकांची चूल पेटणार नाही . कारण गॕसचे दरही हजारावर गेले आहेत.

येथील लोणावळा बसस्थानकात याबाबत आढावा घेतला असता येथील रसाचे गु-हाळ , चिक्की स्टाॕल , पान पट्टी वाला , पेपर स्टाॕलवाला ,कँटीन चालक व कामगार , येथे प्रवाशी येतात त्यांना घरी , हॉटेलला व पर्यटनस्थळे दाखविल्यासाठी सोडायला जाणारे रिक्षा व टॕक्सीचालक , हातावर वेफर , पाणीबाटली आदी विकणारे फेरीवाले , तसेच पार्सल जमा करणारे व बाहेरगावच्या बसने पाठवणारे असे शेकडो लोकांचे पोट या बसस्थानकावर अवलंबून आहे.

याबाबत चालक व वाहक तसेच वहातूक नियंत्रक तसेच स्थानकप्रमुख , डेपोचालक यांनी आणि संघटना यांनी विचार करून निर्णय घ्यावा. लांब गावचे मुळशी मधील प्रवाशी आहेत , त्यांचेही जाणे येणे बंद झाल्याने जनता ञस्त आहे. त्यातून खाजगी वाहतूक करणारे आव्वाचे सव्वा भाडे वाढवून जनतेची लूट करत असल्याने बसचा कर्मचारी संप महाराष्ट्रात जनतेचे कंबरडे मोडणारा आहे,असे काही प्रवाशी व कामगार आणि नागरिकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!