आरोग्य व शिक्षण

पे अँन्ड पार्क विरोधात अपना वतन संघटनेतर्फे आंदोलन – सिद्धिकी भाई शेख

Spread the love

चिंचवड : पे अँड पार्क योजना रद्द करण्याच्या मागणीवरून अपना वतन संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने या योजनेच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमधील सत्तारूढ पक्ष नेत्यांच्या खुर्चीचा लिलाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सिद्धिकी भाई शेख यांनी सांगितले.

सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांच्या बिजलीनगर येथील कार्यालयासमोर शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.संघटनेने यापूर्वीही विरोधीपक्षनेते, महापौर यांच्या कार्यालयासमोर या योजने विरोधात आंदोलन केले होते.

सर्वसामान्यांची लूट थांबविण्यासाठी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन संघटनेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!