आरोग्य व शिक्षण

फ्रेंड्स ऑफ नेचरने केला आदिवासी मुलांबरोबर बालदिन साजरा

Spread the love

रायगड : रायगड जिल्ह्यातील ऊंबरविरा या आदिवासी वस्तीवरील बालगोपालांसोबत तळेगाव येथील सामाजिक संस्था फ्रेंडस् ऑफ नेचरने मोठ्या उत्साहात शैक्षणिक साहित्याचे वाटप करत बालदिन साजरा केला.

गेली ८ वर्ष  फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था या ठिकाणी  सातत्याने चौथीपर्यंतच्या मुला-मुलींना कपडे, वह्या, पुस्तके,खाऊ यांचे वाटप करीत आहे. याहि वर्षी काल (दि १४ नोव्हेंबर) रोजी बालदिनाचे औचित्य साधून फ्रेंड्स ऑफ नेचर च्या कार्यकर्त्यांनी लहान – थोर सर्वासाठी, कपडे, वह्या, कंपास , खाऊ, साड्या, ड्रेस, शर्ट्स, पॅन्ट्स, फळझाडे, खेळणी ई साहित्य वाटप केले.

हा भाग दुर्गम असल्याने सर्व साहित्य चार कि.मी. जंगल वाटेने खांद्या-डोक्यावर वाहून नेण्यासाठी  फ्रेंड्स ऑफ नेचर सदस्यांबरोबरच आदिवासी तरुणांनीही   मदत केली. सर्व साहित्य वाटून झाल्यावर महिला व मुले- मुली यांना निसर्ग संवर्धन व शिक्षणाचे महत्व समजाऊन सांगत प्रबोधन करण्यात आले . यावेळी बाल चमूंच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद एक वेगळेच समाधान देणारा होता.लहान थोर सर्वानीच आवश्यक मदत मिळाल्याने आनंद व्यक्त केला. या प्रसंगी फ्रेंड्स ऑफ नेचरच्या वतीने आदिवासी बांधवांच्या घरासमोर विवध फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रकल्पपूर्ती साठी संस्थेचे सुपर्णा गायकवाड, महेश महाजन, तनया महाजन, कांचन करंजकर, चंद्रकांत माजगणकर , राकेश बागल, शंतनु कलोलकर, विद्या गोडसे, प्राजक्ता मानकर, काव्या भोंडगे, डॉ.गणेश सोरटे, अमीत पोतदार इत्यादी सदस्यानी परिश्रम घेतले.वाटप केलेले सर्व साहित्य हे श्रीशैल मेंथे, मोरे काका, श्रीरंग तगारे, व संस्थेच्या सदस्यानि, संस्थेच्या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद देत देणगी स्वरूपात केलेल्या मदतीतून जमा झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!