आरोग्य व शिक्षण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नवव्या पुण्यस्मरणानिमित लोणावळ्यात अभिवादन

Spread the love

लोणावळा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लोणावळ्यात शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले.

यावेळी खंडाळा तलावातील बोटींगच्या अपघातात बुडणारे पर्यटकांना वाचविणा-या सात तरूणांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच फळे आणि शिवभोजन थाळीचे गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर ,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे , शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक तसेच विरोधी पक्षनेत्या व शिवसेना महिला आघाडी जिल्हा सहसंघटिका शादान चौधरी ,तालुका महिला संघटिका संगीता कंधारे तसेच माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , काँग्रेसचे नगरसेवक निखिल कविश्वर , खंडाळा विभाग पदाधिकारी परेश बडेकर , माजी सरपंच संजय भोईर, महाराष्ट्र वहातूक सेना पदाधिकारी संदेश सिरसट, ,संजय शिंदे , शहर सल्लागार राम थरकुडे, जितेंद्र ठोंबरे , भगवान देशमुख , नागेश दाभाडे , तसेच मनेष पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजुभाई खांडभोर यांनी तसेच गायकवाड  , निखिल कविश्वर ,विलास बडेकर यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य व संघटन कौशल्य , हजरजबाबी स्वभाव आणि नेतृत्व गुणांचे त्यांचे सामना व मार्मिकमधील अग्रलेख याबाबतीत गौरवउद्गार काढले. यावेळी आर.पी.आयचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के यांनीही शिवसेनाप्रमुख श्री.ठाकरे व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचेबद्दल गौरवउद्गार काढले.

यावेळी खंडाळा तलावातील बोट उलटून आपघात झाला ;पण स्थानिक तरूणांनी पर्यटकांना पाण्यात उड्या मारून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला .याबद्दल शिवसेना पदाधिकारी परेश बडेकर यांचे सौजन्याने सातही तरूणांचा सन्मानचिन्ह देवून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. ठाकरवाडीचे व खंडाळातील गणेश माडे, आविनाश दिवाकर, अरूण राजभर ,सोनु आली, आजिंक्यकुमार, विशाल राजभर, मुकेश नेताम या शिलेदारांचा भगवी शाल व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय भोईर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!