आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

वेहेरगावात बैलपोळा उत्सहात साजरा

Spread the love

लोणावळा : कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. असे म्हटले जाते. वर्षातून एकदा येतो तो बैलपोळा सण. वेहेरगावात शेतकरी बांधवांनी उत्सहात साजरा केला.

हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.आपल्या शेतकऱ्यांचा सण,आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या बैलाचा सण.शेतामध्ये राबून करतो धरतीची सेवा.अपार कष्ट करणारा सर्जाराजा यांना तळ्यावर आंघोळ घातली . शिंगाला गोंडे , बाशिंग बांधून व गळ्यात घुंगुरमाळा , पायात फुलांचे तोडे बांधून आणि त्यांना गोड पुरणपोळी खाऊ घालून त्याला ओवाळून गावात मिरवणूक काढून बैलपोळा साजरा केला.

बैलपोळ्याच्या येथील प्रगतीशील शेतकरी संतोष पांडुरंग गायकवाड , तसेच प्रसिद्ध गाडामालक सुरेश गायकवाड , तसेच अनेक शेतकरी यांनी बैलांना सजवून मिरवणूक काढली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!