आरोग्य व शिक्षण

काकडाआरती सांगता व कलशारोहन सोहळ्याचे कार्यक्रमाला मेघराजानेही आशिर्वाद दिला ही चांगल्या कामाची पावती म्हणावी लागेल – ह.भ.प.शिवलीला ताई पाटील

Spread the love

लोणावळा : काकडाआरती सांगता व कलशारोहन सोहळ्याचे कार्यक्रमाला मेघराजानेही आशिर्वाद दिला ही चांगल्या कामाची पावती म्हणावी लागेल. छञपती शिवाजीराजे कसे होते , वयाच्या पाचव्या वर्षी घराचे दरवाजे बंद करून गड चढून आले , तेव्हा मांसाहेबांना राजे विचारतात.मांसाहेब हे काय ? तेव्हा मांसाहेब म्हणतात , तुम्हाला राजे व्हायचे आहे , ते बाया नाचवणारे राजे नाही ,तर बाया वाचवणारे राजे व्हायचे आहे! असे शिवबाराजे होते , सागराची खोली व आकाशाची उंची जशी मोजता येणार नाही ,तसेच शिवबाराजांचे चरिञ अथांग आहे , त्यांचा आजच्या तरूण पिढीने आदर्श घ्यावा ,असे ह.भ.प.शिवलीला ताई पाटील कीर्तनात म्हणाल्या .

कुसगाववाडी येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात महिनाभर चाललेल्या काकडाआरती सांगता व मंदिरावरील कलशारोहन सोहळ्याचे निमित्ताने आयोजित तीन दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त राञीच्या कीर्तनात कीर्तनकार शिवलीलाताई पाटील बोलत होत्या

. यावेळी पावसाने हजेरी लावूनही तसेच कीर्तन उशीरा सुरू होऊनही कुणीही जागा सोडली नाही.त्यामुळे अत्यंत जोशपूर्ण कीर्तन करीत महाराज यांनी श्रोत्यांना मंञमुग्ध केले. यावेळी शिवलीलाताई म्हणाल्या , क्रायटेरिया तुमच्या प्रेझेंटेशनवरून लक्षात येतो. तुम्ही किती प्रेझेंटेबल आहात हे तुमच्या वागण्यावरून समजते. तुम्ही कोणता मोबाईल वापरता ! कसे बोलता ! तुमचे चारित्र्य तुमच्या मोबाईल च्या डी पी वरून, तुमच्या स्टेटसवरून तुमच्या साध्या वाक्यावरून कळते , किती माणूस मोठा आहे? तुमच्या ८०%तरूणांचे राधाकृष्ण हेच स्टेटस असते. पण राधा २१वर्षाची कृष्ण पाच वर्षाचा ! तिचे लग्न झालेले होते. तिने प्रेम केले कृष्णावर , जसे शबरीने विठ्ठलावर केले , जसे आई मुलावर करते , जिथे देव मनात आहे , तिथे शोधून पहायची गरज नाही. मावळ्यांनी शिवछञपतींवर केलं ते प्रेम , आपण करतो ती , निव्वळ वासना आहे!,असे त्या पुढे म्हणाल्या .

यावेळी त्यांचा सत्कार महिला वारकरी यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या अलकाताई धानिवले यांनी केला. गायिका कीर्तनकार मोनिकाताई फाटक मांडेकर यांचा सत्कार पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत यांनी तसेच कुसगाव बुद्रूक च्या सरपंच अश्नीनीताई गुंड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी हजारो लोक उपस्थित होते.

या कार्यक्रमात पहिल्या दिवशी कलशाची गणपतीचे मंदिर ते मंदिरापर्यत भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी होमहवन , अभिषेक व कलशारोहन सोहळा वैराग्यमुर्ती ह.भ.प.शंकरमहाराज मराठे यांचे हस्ते झाला. नंतर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम झाला.हरिपाठ झाला.कीर्तन झाल्यावर महाप्रसाद वाटप झाला. तिसऱ्या दिवशी पहाटे चार ते सात काकडाआरती झाली. सकाळी दिंडी प्रदक्षिणा झाली.साडे दहा ते साडेबारा ह.भ.प.निलेशमहाराज कोरडे यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. महाराज म्हणाले ,कृष्णाने गोपाळ जमवून हुतूतू , ,हमामा,चेंडू फळी ,लगोरी ,विटी दांडू खेळ खेळले.दहीकाला करून सर्वांना खाऊ घातला.

या वेळी श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान ट्रस्टचे आध्यक्ष चंद्रकांत घारे , काकडाआरती सोहळा उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश शेळके , उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य विशाल तिडके,सचिव रामदास काळे, आणि सर्व कमिटीचेवतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. यावेळी कुसगाव चे सरपंच सौ.अश्नीनीताई गुंड, सदस्या सौ.सुवर्णाताई भोसले, माजी उपसरपंच प्रविण साळवे , तसेच विणेकरी ह.भ.प.दिपक हुंडारे, मृदूंगमणी निवृत्ती मराठे ,सौरभ ओझरकर, संदिप घारे तसेच दत्ताञेय शिळावणे आदी उपस्थित होते. पुजारी कालीदास घरदाळे आदी उपस्थित होते. कीर्तनकार मोनिकाताई फाटक , गायक वसंतराव मुंगशे , भाऊ निपाणे , नारायण कडू , ह.भ.प.गोणते यांनी साथसंगत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!