आरोग्य व शिक्षण

कलापिनीचे संस्थापक कै. डॉ. शं. वा. परांजपे यांचा स्मृतीदिन संपन्न

'आधी केलेची पाहिजे' या कार्यक्रमात "कलापिनीच्या पाऊलखुणा" या ऑडिओ-व्हिज्युअल लायब्ररीचे उद्घाटन

Spread the love

तळेगाव : कै. डॉ. शं. वा. परांजपे स्मृतीदिना प्रीत्यर्थ ‘आधी केलेची पाहिजे’ हा कार्यक्रम २४ नोव्हेंबर ला कलापिनीच्या सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाला . तळेगावच्या संस्कृतिक इतिहासामध्ये मोलाची भर घालणारा अमूल्य ठेवा कायमस्वरूपी जतन करण्याच्या उद्देशाने, १९९० सालापासूनच्या कार्यक्रमांचं डिजिटलायझेशन करण्यात आलं आहे. “कलापिनीच्या पाऊलखुणा” या कार्यक्रमांतर्गत या ऑडिओ-व्हिज्युअल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले.

आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी, निर्माते राजेंद्र पाटणकर तसंच दुबईस्थित कलापिनीचे हितचिंतक श्रीरंग कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दाबके ट्रस्टचे विश्वस्त अरविंद परांजपे, आर्किटेक्ट जितेंद्र पावगी, कलापिनीचे जुने जाणते कलाकार रवी टोळे, शिरीष जोशी, हेमंत झेंडे हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते. नटराज पूजनावेळी धनश्री शिंदे हिने श्लोकपठण केले.

कार्यक्रमाची सुरुवात कीर्ती घाणेकर, नेहा तापीकर, अंकुर शुक्ल, श्याम चिटणीस, रवींद्र पांढरे, दीपक जयवंत , नागेश फडके यांनी गायलेल्या ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या समर्पक गीताने झाली. प्रदीप जोशी यांनी संवादिनी आणि अनिरुद्ध जोशी याने तबल्याची साथ केली.

डॉ अनंत परांजपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रशांत दिवेकर यांनी त्यांच्या मनोगतातून पूर्वीच्या समृद्ध तळेगावची सफर उत्तम रित्या सगळ्यांना घडवून आणली. यश हंबीर, विश्वास देशपांडे, संपदा थिटे, अनिरुद्ध जोशी यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कलापिनीच्या पाऊलखुणा या लायब्ररीतील निवडक भागाची चित्रफीत सुद्धा यावेळी रसिकांना पाहता आली कलापिनीच्या पाऊलखुणा या लायब्ररीची संकल्पना कलापिनीचे खजिनदार श्रीशैल गद्रे यांची होती तर चित्रफितीची निर्मिती विश्वास देशपांडे व अनिरुद्ध जोशी यांची होती.

पाउल खुणांचा हा साठा जतन करण्यात संपदा, मंदार थिटे, शार्दुल गद्रे आणि चेतन पंडित यांचा सहभाग होता तर या पाउल खुणांच्या अमुल्य साठ्याचे चित्रिकरण नटराज फोटो स्टुडीओचे हनु मंत शिंदे व त्यांचे सुपुत्र योगेश शंदे हे गेली ३१ वर्षे सातत्याने करत आहेत. हा प्रकल्प पुण्याच्या दाबके ट्रस्ट यांनी दिलेल्याअनुदानातून साकार होत आहे.


राजेंद्र पाटणकर यांनी त्यांच्या मनोगतातून कलापिनीच्या या सुवर्णसाठ्याचा उपयोग आत्ताच्या पिढीला कसा करून घेता येईल याबाबत मार्गदर्शन केलं.संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या मुलाखतींवर आधारित एक दर्जेदार दृक श्राव्य कार्यक्रम “गुण घेईन आवडी” अरविंद परांजपे आणि संपदा थिटे यांनी सादर केला.

कार्यक्रमाचे समयोचित आणि सुंदर निवेदन माधुरी ढमाले – कुलकर्णी यांनी केले.कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कलापिनीचे किशोर कसाबी, अनघा, श्रीपाद बुरसे,विपुल परदेशी,ज्योती ढमाले, गीता संपथ यांनी सहकार्य केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!