आरोग्य व शिक्षण

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सचिवा विरोधात प्रदीप नाईक यांची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार

Spread the love

चिंचवड : येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सचिवा विरोधात मूलभूत अधिकारावर गदा आणल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे.

अरुण बाजीराव गडदे (रा. तळेगाव) यांनी भगवान पालव सन्स अॅन्ड बिल्डर अँन्ड कॉन्ट्रॅक्टरचे प्रकाश जनार्दन लामगे यांनी त्यांची एका फ्लॅट संदर्भात फसवणूक केल्याची माहिती गडदे यांनी प्रदीप नाईक यांना दिली.

हा  फ्लॅट मुंबई येथे असल्याने या फसवणुकी संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीसाठी प्रदीप नाईक गेले असता महापौरांनी भेटण्याचे टाळले. तसेच महापौरांचे सचिव संतोष जाधव यांनी उर्मटपणे बोलून भारतीय घटनेनुसार आपल्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार आयोगाकडे देण्यात आलेल्या अर्जात केली आहे.

सचिव संतोष जाधव यांच्याकडे  डेप्युटी इंजिनिअरचा नंबर मागितला असता तो नंबर देण्यास जाधव यांनी टाळाटाळ केली. तसेच माझ्या मूलभूत अधिकाराचा गळा दाबत जोरात माझ्या अंगावर ओरडून बोलले की तुम्ही जर असे पुन्हा बोलला तर तुमचे काम मी आडवून ठेवेल व मी तुमचे काम होऊ देणार नाही अशा प्रकारे त्यांनी माझ्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे असे अर्जात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!